जळगाव समाचार डेस्क | २६ डिसेंबर २०२४
92 वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना आज संध्याकाळी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सिंग यांना रात्री सुमारे ८ वाजता एम्सच्या आपत्कालीन विभागात आणले गेले. त्यांना लंग्स इन्फेक्शनचा त्रास असून, डॉक्टरांची एक तज्ज्ञ टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून उपचार करत आहे.
सिंग यांची स्थिती गंभीर असून, त्यांच्यावर सतत निरीक्षण ठेवले जात आहे. एम्समध्ये सुरक्षा प्रोटोकॉल वाढवण्यात आले आहेत आणि परिसरात कडक नियंत्रण ठेवले जात आहे. सिंग यांच्या तब्येतीबद्दल अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असे एम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मनमोहन सिंग यांच्या तब्येतीच्या स्थितीबद्दल देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे.