Monday, December 23, 2024
Homeजळगावडॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद…

डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद…

 

जळगाव समाचार डेस्क | ५ नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहरातील अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून माजी आमदार ऍड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते या प्रचार मोहिमेची सुरुवात झाली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात जळगाव शहरातील नामांकित डॉक्टरांसह विविध मान्यवरांचा सहभाग दिसला.

शहरातील शाहूनगर, जे.डी.सी.सी. बँक कॉलनी, पोलीस परेड ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज परिसर, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट पोलीस मुख्यालय, गणेश नगर आणि दंगल ग्रस्त कॉलनी या भागात डॉ. पाटील यांनी आजचा प्रचार दौरा आयोजित केला. प्रत्येक परिसरात जनतेच्या आश्वासक प्रतिसादामुळे शहरात परिवर्तनाची नवी उमेदवारी निर्माण होत असल्याचे स्पष्ट दिसून आले.

डॉ. अनुज पाटील यांना ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींचे आशीर्वाद लाभले. बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेमाची झलक मिळाली, तर निष्ठावान कार्यकर्त्यांनी शहरातील जनतेच्या मनात नव्या जिद्दीची ज्योत प्रज्वलित केली. प्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या डॉ. पाटील यांच्यासमोर मांडल्या, ज्यावर त्यांनी त्वरित तोडगा काढण्याचे वचन दिले.

डॉ. पाटील यांनी जनतेच्या आश्वासक प्रतिसादाला सलाम करत, “हा केवळ निवडणुकीचा लढा नसून नव्या युगाच्या उभारणीसाठीची लढाई आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहा नगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहितचे राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील, जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page