धुळे-येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 52 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मोठा भूकंप झाल्याचे पहायला मिळत आहे. राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
धुळे शहर मतदार संघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या ठाकरे गटातील 52 पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे दिल्याने निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात हे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे
. अनिल गोटे यांनी अनेक वेळा शिवसेना गटावर टीका केली असल्याने अनेक जण नाराज झाले होते. भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांना पाठिंबा जाहीर करीत त्यांचा प्रचार करणार असल्याचे पदाधिकारी महेश मिस्त्री यांनी बोलताना सांगितले.