शिक्षकांसह वनभोज, पाण्यात खेळतांना दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; धुळ्यातील घटना…

जळगाव समाचार डेस्क | २४ ऑगस्ट २०२४

धुळे तालुक्यातील निमडाळे गावात जयहिंद हायस्कूलमधील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थ्यांची नावे हितेश विजय पाटील आणि मयूर वसंत खोंडे अशी आहेत.

घटनाक्रम असा की, शाळेतील काही विद्यार्थी शुक्रवारी वनभोजनासाठी शिपाई धरण परिसरात गेले होते. तेथे काही विद्यार्थी जवळच्या खाणीत साचलेल्या पाण्यात खेळू लागले. खेळता-खेळता हितेश आणि मयूर यांचा पाण्यात अंदाज चुकल्याने दोघेही पाण्यात बुडाले. इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर उपस्थित शिक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर शाळेतील शिक्षकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक ग्रामस्थांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here