मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी कटीबध्द – धनंजय चौधरी

जळगाव समाचार डेस्क | १२ नोव्हेंबर २०२४

न्हावी येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून न्हावी ते आमोदा रस्ता न्हावी ते हिंगोणा रस्ता जलजीवन मिशन 3कोटी रु.पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते,पेव्हर ब्लॉक, न्हावी आमोदा रोडवर लॅम्प व इतर विकास काम करण्यात झालेली आहे भविष्यात सुद्धा विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन रावेर – यावल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी केले. न्हावी येथील ग्रामस्थांशी ते संवाद साधत होते.
रावेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचार फेरी दरम्यान रावेर तालुक्यातील न्हावी येथे आले असता त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन मतदारसंघात पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्यावी, अशी ग्रामस्थांना विनंती केली.
प्रचार फेरीत त्यांच्या समवेत माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती लिलाधर शेठ चौधरी, न्हावी गावचे लोकनियुक्त सरपंच देवेंद्रदादा चोपडे, उपसरपंच नदीमदादा पिंजारी, माजी पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, चिनावल गावचे माजी सरपंच नरेंद्र पाटील (बापू पाटील), केतन किरंगे, रियाज मेंबर, प्रा. एम.टी.फिरके, निळकंठ फिरके, रमेश महाजन, गुणवंत टोंगले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भानुदास चोपडे, सुनील फिरके, विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे, चेतन इंगळे, देवेंद्र चौधरी, मधुकर झोपे, नेमिदास भंगाळे, सुनील वाघुळदे, भूषण फिरके, विश्वनाथ तायडे, सिद्धार्थ तायडे, किशोर पाटील, शांताराम मोरे, चेतन झोपे, संजय वाघूळदे, संगम फिरके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here