Sunday, December 22, 2024
Homeविधानसभा निवडणूकमहायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार - धनंजय चौधरी

महायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार – धनंजय चौधरी

 

जळगाव समाचार डेस्क | १६ नोव्हेंबर २०२४

रावेर यावल विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार पक्ष) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचाराने आता वेग धरला आहे. आज (दि.१५) रावेर तालुक्यातील चोरवड – अजनाड – मोरगाव बु. मोरगाव खु. वाघोड या गावांना भेटी देत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास साधण्यासाठी हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावा.
गेले अनेक वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकसेवक मधुकरराव चौधरी व आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेला सर्वांगीण विकास आणि त्यांचा विकासाचा वसा, वारसा अखंडितपणे पुढे चालवण्याची आम्ही ग्रामस्थांना ग्वाही दिली. रावेर पूर्व भागातील गावांनी नेहमी आमच्या चौधरी परिवारावर प्रेम आणि मतदानरुपी आशीर्वाद दिलेला आहे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी चोरवड येथे व्यायाम शाळेला वॉल कंपाउंड सुरेश नागराज पाटील यांच्या घरापासून ते रमेश नागराज पाटील यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक मोरगाव बु येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम,वाघोड येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम स्मशानभूमीकडे जाणारा रोड डांबरीकरण करणे तसेच अटवाडा ते अजनाड रस्ता डांबरी करण तसेच विविध गावा अंतर्गत काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉकची कामे झालेली आहेत.
महायुतीच्या सरकारमुळे अडीच वर्षात अनेक कामे थांबवली गेली. त्यामुळे निश्चितचं काही कामे राहून गेली आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे ते नक्की पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page