जळगाव समाचार डेस्क | ८ सप्टेंबर २०२४
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार असून सध्या ती मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल झाली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दीपिका अनेकदा बेबी बंपसह स्पॉट झाली असून तिने फोटोशूटही केले होते. विशेष म्हणजे दीपिका जुळ्या बाळांना जन्म देणार असल्याच्या चर्चाही रंगत आहेत.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन बाळाच्या आगमनासाठी देवाचे आशीर्वाद घेतले होते. यावेळी दीपिका पारंपारिक बनारसी साडीमध्ये दिसली, आणि त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यापूर्वी चर्चा होती की, दीपिका विदेशात बाळाला जन्म देणार आहे. मात्र, तिने मुंबईतच डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दीपिका पादुकोणला सप्टेंबर महिन्यात बाळ होणार असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. ती 28 सप्टेंबरला बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा आहे, मात्र सध्या ती कोणत्याही क्षणी आई होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. दीपिका आणि रणवीर यांनी 2018 मध्ये लग्न केले होते, आणि आता सहा वर्षांनंतर ते आई-वडील होणार आहेत.