जळगाव समाचार डेस्क;
दारू कित्येकांचे संसार उधवस्त करते हे पुन्हा सांगायला नको. आता याच दारूने चक्क दारूवार्याचेच दुकानही पेटवल्याची घटना समोर आली आहे. काल १४ जूलै रोजी संध्याकाळी नाशिक (Nashik) येथील सिन्नर फाटा परिसरामध्ये ग्राहकाला मोफत दारू दिली नाही, म्हणून संतापलेल्या ग्राहकाने दारूचं दुकानंच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली.
नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा सोनू भगत नावाचा एक व्यक्ती दारूच्या दुकानात गेला होता. त्याने दुकानदाराला दमदाटी करत दारू फुकट मागितली. परंतु दुकानदाराने त्याला साफ नकार दिला.नकार दिल्याच्या रागाच्या भरात त्याने थेट दारूचं दुकानच पेटवून दिलं. या घटनेत मोठ नुकसान झालं असून आरोपी याला सोनू भगत याला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहे.