जळगाव समाचार | १७ मार्च २०२५
यावल तालुक्यातील दहिगाव येथे दत्त नगरातील २३ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमानंद उर्फ सोनू कमलाकर पाटील (वय २३) याने १४ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता गावालगत असलेल्या किरण मधुकर नेवे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. त्याचा मृतदेह १५ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता बाहेर काढण्यात आला. तब्बल २० तासांनंतर मृतदेह मिळाला. तुषार सोनकी यांनी शवविच्छेदन केले.
मयताच्या पश्चात आई-वडील, बहीण, काका, काकू असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा तपास नरेंद्र वाघुळदे करीत आहेत.