कर्तव्य बजावताना CRPF जवान जितेंद्र चौधरी यांचे निधन, पारोळ्यात शोककळा…

जळगाव समाचार | ५ मार्च २०२५

पारोळा शहरातील शेवडी गल्लीतील रहिवासी आणि सीआरपीएफ १०२आर ए एफ बी/११७ बटालियनचे जवान जितेंद्र देविदास चौधरी यांचे श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना मध्यरात्री आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पारोळा शहरात शोककळा पसरली आहे.

त्यांचे पार्थिव श्रीनगर येथून पुणे मार्गे पारोळ्यात आणले जाणार असून, अंतिम दर्शनासाठी शहरात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यविधीचा कार्यक्रम आज (बुधवार, ५ मार्च) दुपारी कुटीर रुग्णालयासमोरील स्टेडियमवर पार पडणार आहे.

जितेंद्र चौधरी यांच्या अंत्ययात्रेला शेवडी गल्ली येथून सुरुवात होईल आणि ती भवानी चौक, श्रीराम चौक, रथ चौक, क्रांती चौक, वाणी मंगल कार्यालय, आझाद चौक, धरणगाव चौफुली मार्गे पारोळा स्टेडियमवर पोहोचेल.

वीरगती प्राप्त जवान जितेंद्र चौधरी यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहीण आणि दोन लहान मुली (अडीच वर्षांची व आठ महिन्यांची) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here