तो नराधम अखेर अटकेत! सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून केली होती हत्या…

 

जामनेर, जळगाव समाचार डेस्क;

जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे सहा वर्षीय बालिकेवर अत्याचर करून तिचा खून (Rape And Murder)केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या पाशवी नराधमाच्या आज मुसक्या आवळल्या (Arrested) आहे.
जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे चिंचखेडा शिवारातील शेतात काही दिवसांपूर्वी घडलेल्या या पाशवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. आरोपी या घटनेनंतर फरार होता. पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपासाची चक्रे फिरवून त्याची ओळख निश्‍चीत केली होती. यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकाला गुंगारा देत होता.
दरम्यान युद्धपातळीवर चाललेल्या शोध मोहिमेला आज दुपारी भुसावळ येथे यश मिळाले. सुभाष इमाजी भिल (३५), रा. वावडदा, ह.मु. चिंचखेडा, ता. जामनेर या नराधमाला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here