रावेर; जळगाव समाचार डेस्क;
रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. तोल काट्यावर मजुराने दुसऱ्या मजुरावर विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मजूर गंभीररीत्या जखमी झाला आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)
या बाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील प्रिंपी रस्त्यावर असलेल्या जय भोले तोल काट्यावर केळीमा माल असलेल्या गाडीचे आधि वजन कोण करणार या क्षुल्लक कारणावरून विकी यशवंत वाघ (रा . आहिरवाडी) व रियाज रफिक तडवी यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला कि विकी वाघ याने रियाज रफिक (१८) याच्या मानेवर विळ्याने हल्ला चढवला. तसेच गणेश देविदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव, मंगल पाटील यांनी फिर्यादी सबदर तडवी व रियाज यास मारहाण केली. या बाबत सबदर हैदर तडवी (रा. भोकरी) यांच्या फिर्यादी वरून रावेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक तुषार पाटील करीत आहेत .