जळगाव समाचार | १२ फेब्रुवारी २०२५
राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या वहिनीवर तिच्या दीराने बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपी दीर सध्या फरार आहे.
दुपारच्या वेळी पीडित महिला तिच्या खोलीत एकटीच होती. ही संधी साधून तिचा दीर खोलीत शिरला आणि जबरदस्ती केली. महिलेने प्रतिकार केला आणि आरडाओरड सुरू केली. आरडाओरड ऐकून शेजारी धावून आले, त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.
महिलेच्या पतीला जेव्हा याबाबत समजले, तेव्हा त्याने तिला सोबत घेत पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि दीराविरोधात तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीचा शोध सध्या पोलिस करत आहे.