जळगाव समाचार | २३ एप्रिल २०२५
जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाट्यावर २० एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून एका २२ वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. निखिल धनराज अहिरे (वय २१, रा. मन्यारखेडा) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करून उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे.
सामान्य लघुशंकेवरून झालेल्या वादातून फाट्यावर असलेल्या अनधिकृत टपरी चालवणाऱ्या संजू कासार व त्याच्या दोन मुलांनी मिळून निखिल याच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने पोटात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी निखिल अहिरे यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात संजू कासार व त्याच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.