जळगाव:-जळगाव शहरातील नवीन बस स्थानक आवारात बस मध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या पाकीट,पिशवी, पर्स , मौल्यवान वस्तू किंवा रोकड लांबविण्याच्या घटना अलीकडे वाढल्या असून महिलांच्या पर्समधून रोख रक्कम लांबवल्यानंतर शनिवारी पाच रोजी पुन्हा चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या खिशातून एक लाखांची रोकड चोरून हात साफ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अजंदे तालुका धुळे येथील रहिवासी असलेले महेंद्र राजाराम मराठे व 35 हे कामानिमित्त जळगावत आले असता पाच रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बस स्थानक येथे जळगाव मांजरोद या बस मध्ये चढत असताना त्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आले. सर्वत्र शोध घेऊनही चोरट्यांचा थांबताना लागल्याने अखेर महेंद्र मराठे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप पाटील करीत आहे..