जळगाव समाचार डेस्क;
प्रसूती कळा येऊ लागल्याने एका गर्भवतीला रुग्णालयात भरती केले होते. मात्र अचानक तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र त्यानंतर सार होत्याच नव्हत झालं. तिच्यासाहित बाळाचाही मृत्यू झाल्याची दुखःद वृत्त डॉक्टरांनी परिवाराला दिली. परीवारानेही मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र त्यानंतर साऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी फिर्याद दिली.(Crime)
मिळालेल्या महिनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या हस्तिनापूर येथील राठौरा खुर्द येथील आहे. राठौरा खुर्द गावात राहणाऱ्या संदीपने पत्नी नवनीत कौरला डिलीवरीसाठी मेरठच्या कस्बा मवाना येथील जेके हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण सर्जरी दरम्यान नवनीतचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चिता जळाल्यानंतर नातेवाईक राख आणण्यासाठी पोहोचले. त्यावेळी मृत महिलेच्या नवऱ्याला तिच्या राखेमध्ये सर्जिकल ब्लेड दिसलं. त्याने ते सर्जिकल ब्लेड उचललं व थेट पोलीस स्टेशन गाठलं. महिलेच्या ऑपरेशन दरम्यान तिच्या पोटातच हे सर्जिकल ब्लेड राहिलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे.
नातेवाईकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेरठच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे हे सर्व घडलं आहे अस त्यांचे म्हणणे आहे.
परिवाराने सीएम ऑफिसमध्येही न्यायासाठी प्रार्थना केली असून, मेरठच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने या घटनेनंतर रुग्णालयाचा परवाना निलंबित केला आहे.