अल्पवयीन मुलींना पळवून नेत नदीकिनारी अत्याचार

दोन जणांना अटक ; एकाची बाल सुधार गृहात रवानगी, दुसऱ्याला कोठारी

चोपडा:-  दोन अल्पवयीन मुलींना मोटरसायकलवर पळवून नेत त्यांच्यावर तापी नदीच्या किनारी अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या एका उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह एका तरुणाला अडावद पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील एक विधी संघर्षित बालकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून दुसऱ्या संशयित तरुणाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील अडावद परिसरात एका गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेत दोन जणांनी तापी नदी किनारी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान याबाबत अडावद पोलीस स्टेशनला दोन्ही अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने हरविल्याची नोंद करण्यात आली .

 

मात्र आता या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात पोहेकॉ संजय धनगर ,सतीश भोई करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here