धक्कादायक; क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

जळगाव समाचार डेस्क | २८ जानेवारी २०२५

वसईच्या कोपर गावात क्रिकेट खेळताना सागर वझे (वय २७) या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी तो गावातील मैदानावर क्रिकेट खेळत होता. सागरने सलग दोन चेंडूंवर षटकार मारले, पण तिसरा षटकार मारत असताना तो अचानक मैदानात कोसळला.

त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याआधीही सागरला हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी त्याला क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला होता.

सागरच्या अचानक निधनाने गावातील क्रिकेटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. कमी वयातच हृदयविकारामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here