Sunday, December 22, 2024
Homeजळगावकाँग्रेसच्या दुसऱ्या यादीत भुसावळच्या डॉ.राजेश मानवतकर यांना संधी

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत भुसावळच्या डॉ.राजेश मानवतकर यांना संधी

भुसावळ – महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर काँग्रेसने शनिवारी आपल्या 23 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात भुसावळ मधून डॉ.राजेश मानवतकर यांना संधी देण्यात आली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून डॉ.मानवतकर यांना येथे उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने आपल्या यापूर्वीच्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर शनिवारी जाहीर केलेल्या दुसर्‍या यादीत 23 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेल्या दुसर्‍या यादीत काँग्रेसने भुसावळ (राखीव) मतदारसंघातून राजेश तुकाराम मानवतकर यांना संधी दिली आहे.

असे आहेत काँग्रेसचे उमेदवार

डॉ.राजेश तुकाराम मानवतकर- भुसावळ (राखीव)
डॉ. स्वाती संदीप वाकेकर- जळगाव (जामोद)
महेश गांगणे- अकोट
शेखर प्रमोदबाबू शेंडे – वर्धा
अनुजा सुनील केदार – सावनेर
गिरीश कृष्णराव पांडव – नागपूर दक्षिण
सुरेश यादवराव भोयर – कामठी
पूजा गणेश थावकर – भंडारा (राखीव)
दलीप वामन बनसोड – अर्जुनी – मोरगाव (राखीव)
राजकुमार लोटुजी पुरम – आमगाव (राखीव)
प्रो. वसंत चिंडूजी पुरके – राळेगाव
अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर – यवतमाळ
जितेंद्र शिवाजीराव मोघे – आर्णी (राखीव)
साहेबराव दत्तराव कांबळे – उमरखेड (राखीव)
कैलास किसनराव गोरंट्याल – जालना
मधुकर कृष्णराव देशमुख – औरंगाबाद पूर्व
विजय गोविंद पाटील – वसई
काळू बधेलिया – कांदीवली पूर्व
यशवंत जयप्रकाश सिंह – चारकोप
गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा
हेमंग ओगळे – श्रीरामपूर (राखीव)
अभयकुमार सतीशराव साळुंखे – निलंगा
गणपतराव आप्पासाहेब पाटील – शिरोळ

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page