Breaking; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ ऑगस्ट रोजी जिल्हा दौर्यावर…

 

जळगाव समाचार डेस्क| ६ ऑगस्ट २०२४

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे १३ ऑगस्ट रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौऱ्यात महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत सागर पार्क, जळगाव येथे त्यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महिला सशक्तिकरणाच्या विविध उपक्रमांची चर्चा होईल आणि महिला सक्षमीकरणाचे नवनवीन उपक्रम सुरू केले जातील.(Jalgaon)
तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे १२ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात अमळनेर येथे युवा व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी तीन वाजता प्रताप महाविद्यालयात आयोजित युवा संवाद कार्यक्रमात अजित पवार उपस्थित राहतील.
सायंकाळी पाच वाजता कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अजित पवार शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here