मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्यता…

0
50

जळगाव समाचार डेस्क | २८ सप्टेंबर २०२४

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोमवारी जळगाव जिल्ह्यात संभाव्य दौरा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले असून, रविवारी या दौऱ्याबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.

सोमवारी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील उद्योजकांसाठी विशेष सत्रे घेण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. तसेच, मुक्ताईनगर येथे ‘लाडकी बहीण’ योजनेचा मेळावा आयोजित केला जाणार असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाला अधिकृतपणे दौऱ्याचे पत्र प्राप्त झालेले नव्हते. तथापि, संभाव्य दौऱ्याच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here