धक्कादायक; चोपड्यात १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या…

जळगाव समाचार डेस्क | ७ सप्टेंबर २०२४

चोपडा तालुक्यातील एका गावात अमानुष अत्याचाराची घटना समोर आली आहे, ज्यामध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पीडिता आपल्या घराजवळ असताना, आरोपीने तिला शेतात ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर निर्दयीपणे डोक्यात दगड मारून तिचा जीव घेतला.
ग्रामस्थांनी घटना समजताच तातडीने पोलिसांना कळवले. चोपडा पोलिस स्टेशनमधील कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळी पुरावे गोळा केले आहेत. पीडितेचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या जिल्ह्यात या भयानक घटनेमुळे वातावरणात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here