जळगाव समाचार डेस्क | २८ नोव्हेंबर २०२४
चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथे चारित्र्यावर संशय घेत पित्याने रागाच्या भरात स्वतःच्या दोन मुलांचा कुऱ्हाडीने खून केला, तर पत्नीवरही हल्ला करून तीला गंभीर जखमी केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संजय नाना सिंग पावरा (वय २३) हा पत्नी आणि दोन मुलांसह राहात होता. दि. १८ नोव्हेंबर रोजी पत्नीशी झालेल्या वादामुळे ती मुलांसह मध्य प्रदेशातील देवली येथे माहेरी गेली. संजय तिला भेटण्यासाठी देवली गेला, तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात संजयने कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ल्यात मुलगा डेविड (वय ५) आणि मुलगी डिंपल (वय ३) यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीवर पाच ते सहा वार करण्यात आले असून ती गंभीर जखमी झाली आहे.
गावकऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्य प्रदेशातील वरला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. जखमी पत्नीवर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या अमानुष घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील करत आहे.