जळगाव समाचार | १६ एप्रिल २०२५
चोपडा शहरातील गोरगावले रस्त्यावरील झोपडपट्टीत पाच वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.
मध्यप्रदेशातील पिपऱ्यापानी (ता. वरला. म.प्र) येथील २२ वर्षीय मयाल गिरदार वास्कले या नराधमाने कुरकुरे देतो असे सांगून मुलीला झोपडीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ झोपडीत धाव घेतली.
यांपैकी यश चौधरी यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित मुलीला आणि आरोपीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. तृप्ती पाटील यांनी मुलीवर तात्काळ उपचार सुरू केले असून आरोपीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
या घटनेचा गुन्हा पोलीस निरीक्षक मधुकर सावळे, एकनाथ भिसे, जितेंद्र वल्टे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी यांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत नोंदवला.
ही घटना समजताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी होत आहे.