चोपडा तालुक्यात धक्कादायक प्रकार : १७ वर्षीय अल्पवयीन अत्याचारातून गर्भवती; आरोपी पोलिस कोठडीत

 

जळगाव समाचार | २८ ऑगस्ट २०२५

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गरोदर असल्याचे उघड झाल्याने या घटनेची तीव्र दखल घेतली जात आहे.

या प्रकरणी अविनाश वेस्ता पावरा (२२, रा. अंमलवाडी, पो. उमर्टी, ता. चोपडा) याला पोलिसांनी अटक केली असून अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने जानेवारी २०२३ पासून चोपडा शहरातील शिरपूर रोड परिसरातील एका हॉस्पिटलच्या मागे, तसेच पीडितेच्या मैत्रिणीच्या खोलीत वारंवार अत्याचार केले. शिवाय २६ जून २०२५ रोजी शिरपूर रोडवरील झुडपांतही अत्याचार केल्याचे पीडितेच्या फिर्यादीत नमूद आहे. पीडित मुलगी सध्या बारावीत शिक्षण घेत असून ती बाहेरच्या तालुक्यातील असल्याचे कळते.

या तक्रारीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here