जळगाव समाचार डेस्क | ५ ऑक्टोबर २०२४
छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्याच्या दंतेवाडा सीमारेषेवर सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षारक्षकांना मोठं यश मिळालं आहे. या कारवाईत आतापर्यंत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुरक्षारक्षकांनी नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर धडक दिली, त्यानंतर चकमक सुरू झाली.
दंतेवाडा बॉर्डरवर नक्षलवाद्यांची कुमूक पोहोचल्याची खबर सुरक्षायंत्रणांना खबऱ्यांमार्फत मिळाल्यानंतर तात्काळ कारवाईचा निर्णय घेण्यात आला. या परिसरात जवळपास 600 पेक्षा जास्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले असून सुमारे 6 नक्षली कंपन्या या भागात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.