चाळीसगावच्या मिरची बाजारात भीषण आग; मोठे आर्थिक नुकसान

जळगाव समाचार | ११ एप्रिल २०२५

चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत बाजारातील काही मोटारसायकली आणि एक ट्रक जळून खाक झाला. आग इतकी मोठी होती की परिसरात धुराचे लोट आणि आगीचे लोळ दूरवरून दिसत होते.

या बाजाराजवळच पेट्रोल पंप असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बाजारात मोठ्या प्रमाणावर मिरची आणि इतर शेतमाल साठवलेला होता, तो संपूर्ण जळून गेल्याची शक्यता आहे.

या घटनेत व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच चाळीसगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here