चाळीसगाव -फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका 28 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका वरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की चाळीसगाव शहरातील एका भागात 28 वर्षीय विवाहिता परिवारासह वास्तव्याला असून संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे याने विवाहितेचा पाठलाग करून तिच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली. तसेच विवाहितेचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डींग तिच्या पतीला पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयित आरोपी तुषार बोरसे याने विवाहितेला दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर नेले व ज्युसमध्ये गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला तसेच याबाबत कुणाला सांगितले किंवा पोलिसात तक्रार दिली तर परिवाराला जीवेठार मारेल, अशी धमकी दिली. 2 जुले ते आजपावेतो हा प्रकार घडला.
दरम्यान, हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे यांच्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते हे करीत आहे