जळगाव समाचार डेस्क| ३० ऑगस्ट २०२४
कोलकाता आणि बदलापूरमधील घटनांनंतर महिला सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली जात असतानाच, आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
There is a lot of anger among the students after the hidden cameras were found in the washroom of the female students’ hostel
सदर घटना उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच कॉलेजबाहेर संतप्त आंदोलन केले. हा प्रकार बी. टेकच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याने आणखी एका विद्यार्थ्याच्या मदतीने केला असल्याचा आरोप आहे. छुप्या कॅमेऱ्यांनी वॉशरुममधील व्हिडिओ काढल्याचा आरोप संतापलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी आरोपी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या आवारात ‘आम्हाला न्याय द्या’ अशा घोषणांचा गजर करत आंदोलन पुकारले. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्चचा वापर करून संताप व्यक्त केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्यार्थ्याचे नाव विजय असल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही संतप्त विद्यार्थ्यांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मध्यरात्री ३.३० वाजेपर्यंत हॉस्टेलच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं.
Hidden Cameras found in girls washroom in an Engineering College in Krishna district, AP. Students staged a protest & demanded stern action. Police seized cellphone of BTech final year student Vijay & he was questioned. A case is being registered. pic.twitter.com/DsjAA0Fv2d
— Sowmith Yakkati (@YakkatiSowmith) August 30, 2024
या घटनेनंतर कॉलेज प्रशासन आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.