Sunday, December 22, 2024
Homeजळगावनेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द...

नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द…

जळगाव समाचार डेस्क | २४ ऑगस्ट २०२४

नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. या वेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नेपाळमधील दुर्देवी दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे निधन झाले. या दु:खद घटनेत मृत्यू पडलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांची गावे पुढीलप्रमाणे आहेत:

– प्रकाश नथ्थू कोळी (सुखडे), तळवेल
– रोहिणी सुधाकर जावळे, वरणगाव
– पल्लवी संदिप सरोदे, वरणगाव
– अनिता अविनाश पाटील, दर्यापूर
– सरोज मनोज भिरुड, जळगाव/तळवेल
– सुलभा पाडुरंग भारंबे, भुसावळ
– गणेश पाडुरंग भारंबे, भुसावळ
– मिनल गणेश भांरबे, भुसावळ
– परी गणेश भारंबे, भुसावळ
– विजया कडू जावळे, वरणगाव
– निलिमा चंद्रकांत जावळे, वरणगाव
– संदिप राजाराम सरोदे, वरणगाव
– तुळशिराम बुधा तायडे, तळवेल
– सुहास प्रभाकर राणे, तळवेल
– निलिमा सुनिल धांडे, भुसावळ
– भारती प्रकाश जावळे, वरणगाव
– सागर तडु जावळे, वरणगाव
– आशा समाधान बाविस्कर, तळवेल
– सरला तुळशिराम तायडे, तळवेल
– अनुप हेमराज सरोदे, वरणगाव
– सरला सुहास राणे, तळवेल
– पंकज भागवत भंगाळे, वरणगाव
– मंगला विलास राणे, तळवेल
– रिंकु चंदना सुहास राणे, तळवेल
– सुधाकर बळीराम जावळे, वरणगाव

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी विविध राजकीय व शासकीय अधिकारी उपस्थित राहिले होते.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page