जिल्ह्यात लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले…

जळगाव समाचार | २८ फेब्रुवारी २०२५

पारोळा तालुक्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, एन.ए. झालेल्या नऊ प्लॉटवर नोंदी लावण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. महेशकुमार भाईदास सोनवणे (वय ५०, रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा) असे या तलाठ्याचे नाव आहे.

तलाठी सोनवणे यांनी नोंदीसाठी एकूण १० हजार १७० रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर सहा हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती एसीबीला दिली. त्यानंतर गुरुवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग राजपूत, पो. हे. कॉ. किशोर महाजन, पो. कॉ. राकेश दुसाणे आणि पो. कॉ. पोळ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here