Breaking; अजित दादांचा मंत्री भाजपच्या गळाला ? माजी मंत्र्यांचा दावा…

जळगाव समाचार डेस्क;

एक वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून अनेक बड्या नेत्यांनी काढता पाय घेऊन अजित पवारांच्या (Ajit Pawar) अध्यक्षतेखाली आपलं बस्तान बसवलं होतं. आणि सोबतच भाजप शिवसेनेसोबत सत्तेत बसले होते. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसोबतच लढवली होती. मात्र आपल्या वाटेला आलेल्या चार पैकी एकच जागा जिंकता आली. या निकालाचा धसका अनेक नेत्यांनी घेतल्याचं निदर्शनास आले आहे.
दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर चक्क पक्षाचे व्हीप आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे भाजपात जाऊ शकतात असे खळबळजनक वक्तव्य माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी केले आहे. या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, अनिल पाटील हे पूर्वी भाजपचेच होते, त्यामुळे त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहे. दरम्यान त्यांना पुन्हा भाजपवासी होण्याच्या दृष्टीनेच त्यांनी केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here