Breaking; जळगाव रेल्वेस्टेशनवर चालती ट्रेन पकडण्याच्या नादात महिला पडली…

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगावात नुकतीच महिला रेल्वेत चढतांना खाली पडल्याची घटना ताजी असताना, आज जळगाव स्थानकावर पुन्हा एक महिला चालत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून पडली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, आज दि. ६ जुलै २०२४ शनिवार रोजी सकाळी ६:२० च्या सुमारास ट्रेन क्रमांक १२१४१ पाटलीपुत्र एक्सप्रेस, चालू ट्रेन मध्ये चढतांना एक महिलेचा पाय घसरला, लोकांनी वेळेवर ट्रेन ची चैन ओढून ट्रेन थांबवली. सुदैवाने त्या महिलेला कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. दरम्यान घटनास्थळी जळगाव रेल्वे स्थानकावर RPF टीम येऊन सदर महिलेला पुढील कार्यवाही साठी RPF ठाण्यात घेऊन गेले. महिलेसोबत पती व दोन लहान मुली होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here