जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२५
यावल तालुक्यातील किनगाव परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका शिक्षिकेने दोन विद्यार्थ्यांना रिक्षात बसून कॉपी करण्यास मदत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याची चर्चा रंगली आहे.
ही घटना सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी याची दखल घेतली. त्यांनी गटशिक्षणाधिकारी श्री. धनके यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, यावल पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिकेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करत आहेत.

![]()




