मोठी बातमी; मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य स्फोट; संपूर्ण प्रशासन हादरलं…

 

अमरावती, जळगाव समाचार डेस्क;

अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Amravati Central Jail) या घटनेने संपूर्ण प्रशासन हादरलं आहे. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
या घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास अचनाक अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात मोठा स्फोट झाला. बॅरेक क्रमांक 6 आणि 7 च्या समोर हा स्फोट झाल्याचं समजते. दरम्यान कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त यांचेसह डीसीपी व बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. सखोल तपासाच्या अनुषंगाने फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं.
दरम्यान मिडिया रिपोर्ट्सनुसार, शेजारच्या महामार्गाच्या कल्व्हर्टवरून फटाका किंवा बॉम्ब कारागृहात बॉलद्वारे फेकल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. कारागृहात बॉम्ब सदृश वस्तू फेकणारी व्यक्ती कोण? आणि असं करण्यामागे या व्यक्तीचा नेमका हेतू काय? याचा सध्या कारागृह प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणात सुदैवाची बाब म्हणजे, या प्रकरणात अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here