मुंबई वृत्तसंस्था -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राष्ट्रीय स्तारावरील पंतप्रधान न एक्सरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, डॉ. प्रमोद सावंत, भूपेंद्रभाई पटेल, विष्णू देव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायब सिंह सैनी, हिमंता बिस्वा सरमा, शिवराज सिंह चौहान, शिवप्रकाश, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांचा समावेश आहे.
या यादीत राज्यातील देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नारायण राणे, रावसाहेब दानवे,अशोक चव्हाण, उदयनराजे भोंसले, विनोद तावडे, ॲड. आशिष शेलार, चंद्रकांत (दादा) पाटील, सुधीर मुनगंटीवार,राधाकृष्ण विखे पाटील,गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहोळ, अशोक नेते, डॉ. संजय कुटे यांचा समावेश आहे. याबरोबरच पंकजा मुंडे, स्मृती इराणी, नवनीत राणा या तीन महिला नेत्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.