मोठी बातमी; अमळनेर येथे भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तुफान दगडफेक…

 

जळगाव समाचार डेस्क;

अमळनेर येथून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी अमळनेर मध्ये भुसावळ-नंदुरबार पॅसेंजवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने घटनेत ट्रेनमधील कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही. मात्र या घटनेनंतर प्रवासी घाबरले होते. या व्हिडीओत दिसते की, रेल्वे रुळाच्या आजू बाजूला जमले आहेत. यावेळी ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करत आहेत. ट्रेनमधील प्रवासी घाबरुन आरडाओरड करतं आहेत.
भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरमधून दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. सर्वसामान्यांसाठीची ट्रेन अशी या पॅसेंजर ट्रेनची ओळख आहे. मात्र गेल्या अनेकदिवसांपासून ही ट्रेन जास्तच उशिराने धावत असल्याने. लोकांचा उद्रेक झाला असावा असे म्हटले जात आहे. यावेळी अनोळखी व्यक्तीने ट्रेनची साखळी खेचून गाडी थांबवली. यानंतर ही दगडफेक केली गेल्याने हा पूर्वनियोजित कट असल्याची शंका नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here