खळबळजनक; भुसावळमध्ये ईदला गालबोट, ईदगाहवर एकावर चाकू हल्ला…

 

जळगाव समाचार | ३१ मार्च २०२५

भुसावळ तालुक्यातील खडका गावाजवळील ईदगाह परिसरात चाकू हल्ल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात आरोपीने एकावर पाठीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले आहे. गंभीर जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक व्यवहारांमध्ये वाद झाल्याने हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी सांगितले की, आठ दिवसांपूर्वी जखमी आणि आरोपीमध्ये आर्थिक कारणावरून वाद झाला होता, ज्यामुळे हा हल्ला घडला.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here