जळगाव समाचार डेस्क | २४ जानेवारी २०२५
जवाहरलाल नगर येथील आयुध निर्माण कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची वेळ सकाळी सुमारे 11 वाजताची आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज 4-5 किमी दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे परिसरातील इमारती व नागरिकांना हादरे जाणवले. या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरु आहे.
या स्फोटाची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून अधिकृत माहिती लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.