आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान भीम महोत्सव कार्यकारणी जाहीर…

 

जळगाव समाचार | ११ एप्रिल २०२६

जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान तर्फे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १४ एप्रिल २०२६ रोजी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे.

या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयुष्यमान विलास यशवंते यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव म्हणून दीपक जोशी, खजिनदार म्हणून भाऊराव सुरडकर आणि गोपाळ भालेराव यांची निवड झाली असून सल्लागारपदी हरिश्चंद्र सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून श्रीकांत तायडे, कुलदीप भालेराव आणि प्रबुद्ध भालेराव कार्यरत राहणार आहेत.

महोत्सवानिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता टॉवर चौकातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत ‘विश्वगर्जना ढोल पथक’ातील सुमारे १०० मुलामुलींचा ढोल वादनाचा आकर्षक सहभाग राहणार आहे. यानंतर सायंकाळी ६ वाजता नेहरू चौक येथे “स्वर यात्रा भीमाची” या भीमगीतांच्या क्रांतिकारी जलशाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक संदीप गावित, भरत अमळकर आणि पी. आर. चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. या जयंती महोत्सवात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here