जळगाव समाचार | २२ फेब्रुवारी २०२५
भडगाव तालुक्यात आणि शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भडगाव पोलिसांनी वडजी येथील सत्यपाल दत्तात्रय निकम याला अटक केली असून, त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दि. २४ जानेवारी रोजी भडगाव शहरातील बाळद रोडवरील महाराष्ट्र बॅटरी दुकानासमोरून एका व्यक्तीची बजाज सी.टी. १०० (एम.एच. १९ ए.एन. १०९६) ही दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी शेख मुनाफ शेख युसुफ (रा. हकीम नगर, भडगाव) यांनी फिर्याद दिली होती.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सत्यपाल निकमला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली आणि त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी करीत आहेत.