मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी धक्कादायक छायाचित्रे समोर; वाचकांना ती विचलित करू शकतात…

जळगाव समाचार | ४ मार्च २०२५

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) घटनेच्या ८० व्या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आरोपींनी देशमुख यांना अमानुष मारहाण करून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात हत्येचे व्हिडिओ आणि छायाचित्रे महत्त्वाचे पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत. हेच पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असून, आरोपींविरोधात हे पुरावे ठोस ठरण्याची शक्यता आहे.

 

सोमवारी या घटनेशी संबंधित काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. या धक्कादायक छायाचित्रांनी नागरिकांना हादरवून सोडले असून, वाचकांना ती विचलित करू शकतात, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी नागरिक आणि स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे. पुढील सुनावणीमध्ये आरोपींवर कायदेशीर कारवाईचा पुढील टप्पा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here