भारताची आशिया कपमधून माघार: बीसीसीआयचा मोठा निर्णय…


जळगाव समाचार | १९ मे २०२५

भारताने आशिया चषक 2025 मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) याबाबत कळवले आहे. हा निर्णय भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.

जून 2025 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग आशिया कपमधूनही भारताने माघार घेतली आहे. ACC चे अध्यक्ष पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी आहेत, आणि स्पर्धेचे आयोजनही ACC करत आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि जनभावनांचा विचार करून भारत सरकारच्या सल्ल्याने हा निर्णय घेतल्याचे BCCI ने स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केली होती. यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.

2025 चा आशिया कप भारतात होणार होता आणि तो टी20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार होता. भारताचे या स्पर्धेतून बाहेर पडणे म्हणजे स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण बरेच प्रायोजक भारतातील आहेत.

याआधी 2024 मध्येही भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला होता, त्यामुळे आशिया कप हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात आला होता.

हा निर्णय भारत सरकारच्या सल्ल्यानुसार घेण्यात आला असल्याचे BCCI ने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here