जळगाव समाचार | १ जून २०२५
बाल रंगभूमी परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 1 जून 2025 रोजी नवी मुंबई सानपाड्यातील वडार भवन येथे पार पडली. या सभेस राज्यभरातील 27 शाखांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत जळगाव शाखेचे अध्यक्ष श्री. योगेश शुक्ल यांची बाल रंगभूमी परिषद, मध्यवर्ती शाखा मुंबईच्या प्रमुख कार्यवाहक पदी निवड करण्यात आली. ही घोषणा परिषदाच्या अध्यक्षा अॅड. नीलम शिर्के-सामंत यांनी केली.
या नियुक्तीबद्दल बाल रंगभूमी परिषद, जळगाव शाखेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांच्यावतीने योगेश शुक्ल यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.