Balochistan : स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा, दिल्लीत लवकरच दुतावास? संयुक्त राष्ट्राकडे प्रस्ताव पाठवला, पाकिस्तानला आणखी एक दणका

Balochistan Independence : पाकिस्तान चांगलाच कोंडीत सापडला आहे. भारतीय लष्कराने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे तर दुसरीकडे बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे बलुच लेखकाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

Balochistan : स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा, दिल्लीत लवकरच दुतावास? संयुक्त राष्ट्राकडे प्रस्ताव पाठवला, पाकिस्तानला आणखी एक दणका.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा

पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी आता चांगलीच जिरणार आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानवर चढाई केल्यानंतर आता बलुच लिबेरन आर्मीला सुद्धा सत्तर हत्तींचे बळ आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे बलुच लेखकाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नसावी.

भारत आणि पाक यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच बलुच लेखक मीर यार बलोच यांनी स्वतंत्र पाकिस्तानची घोषणा केली आहे. सोशल मीडिया एक्सपोर्ट एक्सवर त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील अनेक शहर आणि परिसरावर कधीचाच ताबा मिळवला आहे. याभागातील शाळा, महाविद्यालये, सरकारी आस्थापनातील पाकिस्तानी झेंडे फेकून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे येथे पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने बलुचिस्तान स्वातंत्र्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करावा. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावा. संयुक्त राष्ट्राने सर्व सदस्य देशांची एक बैठक बोलावावी आणि बलुचिस्तानाला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर बलुचिस्तानचे नवीन चलन आणि पासपोर्टसाठी सहकार्य करण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here