(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा
पारोळ्यातील जागृत दैवत स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले प्रभु बालाजी महाराजांना आषाढी एकादशी निमित्ताने सव्वा लाख तुळशीपत्रांच्या आरासीत सजविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आषाढी एकादशी निमित्त पारोळा शहरातील जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मंदिरात प्रभु बालाजी महाराजांचा सकाळी अभिषेक करून भक्तांनी आणलेल्या सव्वा लाख तुळशीपत्रांची आरास प्रभु बालाजी महाराजांना करण्यात आली. याप्रसंगी भाविकांनी सहभागी होत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
सकाळी ११ते १२ वाजेदरम्यान प्रभु बालाजी महाराजांची आरास सजविण्यात आली, यासाठी शहरातील अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात तुळशीपत्रे मंदिरात आणुन दिले असल्याची माहिती पुरोहित हरिष पाठक यांनी सांगितले. मंदिरात हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात सकाळ पासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळ पर्यंत भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती श्री बालाजी संस्थान, महाप्रसाद समिती व विश्वस्त मंडळ, बालाजी स्वयंसेवक मंडळाच्या वतीने देण्यात आली.