जळगाव समाचार | ११ एप्रिल २०२५
बजाज ऑटो कंपनीचे संचालक मधुर बजाज (वय ६३) यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाघात झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज (११ एप्रिल) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मधुर बजाज यांनी २४ जानेवारी २०२४ रोजी प्रकृतीच्या कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या मागे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आहे. फोर्ब्सच्या अंदाजानुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ४.१ अब्ज डॉलर इतकी होती.
फेब्रुवारी २०२१ मध्ये फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीश यादीत ते ४२१व्या क्रमांकावर होते. २०२५ च्या मार्चअखेर त्यांच्या नावावर २,९१४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स होते. बजाज कुटुंबासह मधुर बजाज हे फोर्ब्स इंडियाच्या २०२४ मधील १०० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानावर होते.
बजाज ग्रुप ही देशातील एक आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असून मधुर बजाज यांचा त्या यशात मोलाचा वाटा होता.

![]()




