बहिणाबाई महोत्सवात रंगला मराठी संस्कृती जपणारा फॅशन शो…

जळगाव समाचार डेस्क | २६ जानेवारी २०२५

भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शनिवारी सायंकाळी मराठी संस्कृती जपणारा महिलांचा फॅशन शो पार पडला. यात मराठमोळ्या पोषाखात तरुणींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

सागर पार्क मैदानावरील पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात तिसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. शनिवारची सुट्टी असल्याने अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या. यावेळी महोत्सवात सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उद्योगांना चालना देण्यासाठी स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महोत्सवात साज मेकअप स्टुडिओ यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या मराठी संस्कृतीच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबई,सुरत, पुणे जळगाव येथील २५ मॉडेल्सनी सहभाग घेतला. या शोमध्ये हळदी,लेंगा, मारवडी, गुजराती, मराठी या प्रकारात पेहराव सादर केले. विनामूल्य असलेल्या या शोमध्ये सहभागी स्पर्धक व विजेत्यांना क्राउन व पारितोषिकांनी गौरविण्यात आले. आकर्षक पेहराव असलेल्या माॅडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी अर्चना जाधव यांनी सहकार्य केले. यावेळी , आमदार मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योगपती रजनीकांत कोठारी नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, तहसीलदार शीतल राजपूत, डॉ . पी आर चौधरी, जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी, रवींद्र लढ्ढा,अपर्णा भट,विनोद ढगे, सचिन महाजन, सागर पगारीया , मोहित पाटील,विक्रांत चौधरी, रितेश लिमडा, अक्षय सोनवणे, मंगेश पाटील, दिपक जोशी ,साजीद पठाण आदी उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळी औद्योगिक क्षेत्रातील क्षेत्रातील विशेष योगदानासाठी पीतांबरी उद्योग समूह, सामाजिक क्षेत्रात समर्पण प्रतिष्ठान अमरावती,भातृ मंडळ पुणे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. परेश दोशी व डॉ. प्रीती दोशी यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

आज ‘लावणी महाराष्ट्राची’ व भारत गौरव पर्व हे कार्यक्रम
आज सायंकाळी शाहीर मीरा दळवी व सहकारी यांचा लावणी महाराष्ट्राची तसेच प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा भारत गौरव पर्व हे कार्यक्रम होतील असे आयोजकांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here