जळगाव समाचार | १४ मार्च २०२५
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सुरू होण्यास अवघा एक आठवडा शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सने आपल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. अनुभवी ऑलराऊंडर अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याआधी केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होणार अशी चर्चा होती. त्याला संघाने 14 कोटींना खरेदी केल्यामुळे हा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, फ्रँचायझीने अक्षर पटेलवर विश्वास दाखवला आहे. अक्षरने टी20 क्रिकेटमध्ये बडोदाचे नेतृत्व केले असून त्याने 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत.
अक्षरने 2023 मध्ये आरसीबीविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. त्याने कर्णधार म्हणून आतापर्यंतच्या टी20 सामन्यांत 364 धावा आणि 13 विकेट्स घेतल्या आहेत. कर्णधारपदाची संधी मिळाल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला आणि सांगितले, “दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. संघाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे आणि मी या जबाबदारीसाठी पूर्णपणे तयार आहे.”
दिल्ली कॅपिटल्स संघ (IPL 2025)
अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिचेल स्टार्क, केएल राहुल, जेक फ्रेजर-मॅकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डु प्लेसिस, मुकेश कुमार, दर्शन नालकंडे, विप्रज निगम, दुष्मंथा चमीरा, डोनोवन फरेरा, अजय मंडल, मानवंत कुमार, त्रिपुराना विजय, माधव तिवारी.
IPL 2025 कर्णधारांची यादी
• चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड
• लखनऊ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
• राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
• सनराइजर्स हैदराबाद – पॅट कमिंस
• रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
• पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर
• मुंबई इंडियंस – हार्दिक पंड्या
• कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे
• गुजरात टायटन्स – शुभमन गिल
• दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
IPL 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले असून क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.