पाणी भरण्यास आलेल्या विवाहितेवर अत्याचार

जळगाव समाचार डेस्क|

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय विवाहिता ही पाणी भरण्यास गेली असता तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडले असून ती रोजी या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मूळ मध्य प्रदेश येथील राहणाऱ्या आणि मोलमजुरी करणाऱ्या दापत्य वास्तव्याला असून 21 वर्षीय विवाहिता ही एका घरात पाणी भरण्यास गेली असता, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी सुभाष चव्हाण (रा.श्याम नगर, जळगाव) याने विवाहितेला अंगावर ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तिने आरडाओरड केल्याने पीडीतेचा पती हा दरवाजा लोटून घरात आला. त्यावेळी संशयित आरोपीने विवाहितेचा गळा दाबून ढकलून देत पसार झाला.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमवारी दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री  पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुभाष चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदरे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here